Saturday 20 March 2010


तो राजहंस एक  - ग. दि. माडगुळकर

एक तळ्यात होती,
बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे,
पिल्लू तयांत एक ॥ धृ. ॥

कोणी न त्यास घेई,
खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे
ते वेगळे तरंगे

दावूनी बोट त्याला,
म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे,
पिल्लू तयांत एक ॥ १ ॥

पिल्लास दुःख भारी,
भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी,
सांगेल ते कुणासी?

जो तो तयास टोची,
दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे,
पिल्लू तयांत एक ॥ २ ॥

एके दिनी परंतु,
पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे,
वाऱ्यासवे पळाले

पाण्यात पाह्ताना,
चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले,
तो राजहंस एक ॥ ३ ॥

-- ग. दि. माडगुळकर

3 comments:

Anagha said...

जुन्या कवितेतले साधेपणच मन भावून टाकते..
आणि त्या उलट हल्लीच्या कविता वाचायला गेलं तर एक जात शब्द्बंबाळच वाटतात.
असा का कोण जाणे!

Sach Deshmukh said...

धन्यवाद अनघा..!!

अगदी खरय तुझं .. पण जुन्याशी तुलना करत आपण नव्याचा आनंद नाही घेऊ शकणार..!!

Anagha said...

हेही खरंच!:)