Wednesday 23 December 2009


Sunya sunya maifilit mazya......

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?

कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !

उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे..


--चित्रपट - उंबरठा (१९७७)
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर







जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

Sunday 20 December 2009


गदिमांचे गीत रामायण - अविस्मरणीय ठेवा-

दोन ओन्डक्यांची होते सागरात भेट ..! एक लाट तोडी पुन्हा नाही गाठभेट ..!!
दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा ..! पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ...!!

वि. स. खान्डेकरांची एक अजरामर कलाकृती ‘अमृतवेल‘ मधील सुन्दर वाक्य..!

"भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरूडपंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद स्वप्न पहाणं, ते फुलविणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुस-या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं! माणसाने ओठांशी नेलेला प्याला अनेकदा नियतीला पाहवत नाही.एखाद्या चेटकिणीसारखी ती अचानक प्रकट होते आणि क्षणार्धात तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते.

- वि. स. खांडेकर