Saturday 20 March 2010


तो राजहंस एक  - ग. दि. माडगुळकर

एक तळ्यात होती,
बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे,
पिल्लू तयांत एक ॥ धृ. ॥

कोणी न त्यास घेई,
खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे
ते वेगळे तरंगे

दावूनी बोट त्याला,
म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे,
पिल्लू तयांत एक ॥ १ ॥

पिल्लास दुःख भारी,
भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी,
सांगेल ते कुणासी?

जो तो तयास टोची,
दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे,
पिल्लू तयांत एक ॥ २ ॥

एके दिनी परंतु,
पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे,
वाऱ्यासवे पळाले

पाण्यात पाह्ताना,
चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले,
तो राजहंस एक ॥ ३ ॥

-- ग. दि. माडगुळकर

ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?

YEH MAHALON, YEH TAKHTON, YEH TAAJON KII DUNIYAA

Movie: Pyaasa
Singer(s): Mohammad Rafi
Music Director: S D Burman
Lyricist: Sahir Ludhianvi

ये महलो, ए तख्तो, ए ताजो की दुनिया,
ये इन्सान के दुश्मन समाजो की दुनिया,
ये दौलत के भूके रिवाजो की दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?

हर एक जिस्म घायल, हर एक रुह प्यासि
निगाहॉ में उलझान, दिलो में उडासी,
ये दुनिया है या आलम-ए-बदहवासी,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?

यहाँ एक खिलोना है इन्सान की हस्ती,
ये बस्ती है मुरदा-परस्तो की बस्ती,
यहाँ तो जीवन से है मौत सस्ति,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?

जवानी भट्क ती है बद्कार बन कर,
जलवा जिस्म सजते हें बाजार बन कर,
यहाँ प्यार होता है व्यापार बन कर,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नही है,
वफा कुछ नाही, दोस्ती कुछ नही है,
यहाँ प्यार की क़दर ही कुछ नही है,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?

जला दो इसे, फूक डालो ये दुनिया,
मेरे सामने से हाटा दो ये दुनिया,
तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?

- साहिर लुधियानवि


(आलम-ए-बदहवासी - हताश वातावरण, मुरदा-परस्तो - मृत्यू चे पुजारी,बद्कार - कुकर्मी )

Sunday 14 March 2010

कविवर्य विंदा यांचे काल देहावसान झाले. माझ्या आवडत्या कविपैकी एक..
बा सी मर्ढेकर आणि कुसुमाग्रजांच्या पंगतीतला आणखी तारा आमचे आकाश सोडून गेला..


माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे!
अन्नाशिवाय, कपडय़ाशिवाय,
ज्ञानाशिवाय; मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव!
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्वास.
विसर यांना, दाब कढ;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे!
ऐकू नको हा आक्रोश,
तुझ्या गळय़ाला पडेल शोष.
कानांवरती हात धर,
त्यातूनही येतील स्वर.
म्हणून म्हणतो ओत शिसे;
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या, रडशील किती?
झुरणाऱ्या, झुरशील किती?
पिचणाऱ्या, पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो;
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे!
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर.
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात;
आणि म्हणतात, ‘‘कर िहमत,
आत्मा वीक, उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य;
स्मरा त्याला, स्मरा नित्य.’’
भिशील ऐकून असले वेद;
बन दगड, नको खेद!

बन दगड आजपासून;
काय अडेल तुझ्यावाचून;
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे नि:श्वास
मरणाऱ्यांना देतील श्वास?
आणिक दु:ख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे दु:ख तेच फार;
माझ्या मना कर विचार!
कर विचार : हस रगड;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे!
अटळ आहे घाण सारी;
अटळ आहे ही शिसारी.
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल!

अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा; होतील भुते.
या सोन्याचे बनतील सूळ!
सुळी जाईल सारे कूळ.
ऐक टापा! ऐक आवाज!
लाल धूळ उडते आज;
याच्यामागून येईल स्वार;
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड;
माझ्या मना बन दगड!

    --विंदा 

Thursday 4 March 2010


Beautiful lines by Pu la ....

शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी ... वांग्याचे भरीत ...गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...दुस-याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...दिव्या दिव्या दिपत्कार... आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे...सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श... कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा....