Sunday 2 September 2012

डोक्यातला किडा

 
जेव्हा काही काही कर्तृत्ववान लोकांच्या गोष्टी ऐकतो तेव्हा थोडी बोलीवुडी गोष्ट होते असं वाटत रहातं.. 
हुमायून भारत सोडून पळून गेला तरी पण भली मोठी फौज घेउन परत येतो आणि दिल्ली काबीज करतो.. आणि शिवाजी राजे सगळे आयुष्य अस्तित्त्वाची लढाई करत बसतात..
 
परागंदा राजे, नेते परत येवून मिरवतात, परत नेते बनतात आणि लोकं पण त्यांना दारात उभे करतात (उदा. नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश ) नव्हे त्यांना पूर्वीचे स्थान पण देऊ करतात.. का ?
नवाज शरीफ यांचा पाकिस्तानात परत प्रवेश असो की आंग सु क्यी हिचा म्यानमारमधला लढा... मुद्दा हा आहे की यांचे जरी काही बरे वाईट झाले असते तरी लोकांचा दबाव वगैरे गोष्टी एकाधिकारशाहीमध्ये तितक्याश्या matter करत नाहीत असं दिसतं.. मग दर वेळेस हे सगळे स्यू की आणि तसेच छोटे मोठे नेते या वातावरणात कसे काय तग धरतात याचे आश्चर्य वाटते... नक्की कोणता कार्यकारणभाव या अशा गोष्टींमागे असतो हे काही उमजत नाही..

शेवटी matrix मध्ये ट्रिनीटी निओ ला पहिल्या भेटीत सांगते ते शब्द आठवतात (नीट नाही आठवत आणि dubbed होता ).. 'काही तरी चुकल्या चुकल्यासारख असं वाटत रहातं पण नक्की काय गडबड आहे ते काही कळत नाही..'

'सत्यमेव जयते' शिकतो खरे पण त्या जी ए यांच्या कथेतल्या विदुषकासारखे सत्य कशाला म्हणायचे याचेच उत्तर नाही लागत.. मग जिंकले ते सत्य की आणखी कसं की काय माहित..(मान्य आहे की इतिहास जेत्यांनी लिहिलेला असतो पण तो वेगळा विषय..)

यावर आमचा एक मित्र एक उपाय सुचवतो तो म्हणजे कशाचाच विचार नाही करायचा .. भिकारी दिसला तर रुपया टाकायचा आणि पुढे जायचे.. तो भिकारी का झाला आणि गरीबीचे उच्चाटन वगैरे गोष्टी डोक्यात नाही आणायच्या.. सगळे तोडतात तर सिग्नल तोडायचा आणि बाहेर देशात गेल्यावर तिथे पाळतात म्हणून पाळायचा.. भ्रष्टाचार करतात तर करू देत.. आपण आपली गणपतीची वर्गणी मुकाट द्यायची.. आणि मिरवणुकीने कानठळ्या बसल्या तर खिडक्या बंद करायच्या.. आणि हो अण्णांच्या मोर्च्याला पण बाहेरून पाठींबा द्यायचा फार वाटले तर फेसबुक लाईक आणि थोडी देणगी किंवा जवळच्या रस्त्यावर मोर्चा आल्यावर धावती भेट देवून बाजूला व्हायचं..  
थोडक्यात या सगळ्याचा विचार करणारे आणि या गोष्टी घडवणारे घडवत असतात आपल्या डोक्याचा काथ्या कुटण्याने काही होणार नाही.. 

आणि त्याने किती सांगितले तरी आमच्या डोक्यातला किडा काही जात नाही..

2 comments:

Unknown said...

too good..

Anonymous said...

डोक्यात किडा असलेली माणसे संख्येने कमी असली तरी जग बदलायची ताकत बाळगून असतात. डोक्यातला किडा आणि मनातली ठिणगी जपून ठेवता आली पाहिजे!