Tuesday 11 May 2010

आभास

हळू हळू विसरून जाणार सगळे आता...
आणि मग एक अनोखा अवघडलेला दुरावा साचणार..

आणि मग पुन्हा जेव्हा भेट होईल तेव्हा बरेच काही बदललेले भासेल..
तुलापण आणि मलापण..!

मग काही शिष्टाचार मध्ये येतील मदत करायला.. विचारपूस होते.. आणि मग सगळे आपापल्या मार्गाला..
काहीतरी निसटून जाते आहे ही जाणीव सर्वांनाच.. पण त्याचा विचार करायला वेळ नसणार ..

बर्‍याच गोष्टी अशाच निसटून जातात.. काही कळत.. काही नकळत..

कधीतरी काहीतरी टोचते आत खोलवर..
पण कळतच नाही काय आहे ते..

कारण आठवणी पण अशाच पुसून गेलेल्या असतात.. फ़िकट झालेल्या असतात..

तरीही काही आठवणींचे वास मागे उरलेले .. सगळे एकमेकांत मिसळलेले..

आणि एखाद्या संध्याकाळी.. कातरवेळी मग मन का भरून आले ते आपल्याला पण कळत नाही...
-- सच

6 comments:

संदीप said...

Wonderful composition, very apt with the thoughts..

Some 10 years back, I wrote one on similar thought.. :-)

Keep up writing my friend, you can create magic.. :-)

Sach Deshmukh said...

Thanks mitra..!!!

Anagha said...

निसटतं नाही का आयुष्य हातातून? वाळूसारखं?
वाळूसारखं देखील नाही म्हणता येणार.. ती तरी दिसते निसटताना...

sunshine said...

like it....heart touching....

भानस said...

हृदयस्पर्शी लिहीलेस.

आठवणींचे वासे मन भरून टाकतात. शिवाय नव्याची भरही आहेच की. जीवंत क्षणांचे निसटलेपण... कातरवेळी त्यांचा आठव... दोन्हीही वेळा वेदनाच देऊन जातात.

Swati said...

अगदी हृदयाला हात घालणारं असं लिहिलं आहेस...
पण या वेदनाच तर आपल्याला शिकवून जातात ना कि काय महत्वाचं आहे आपल्यासाठी आयुष्यात... मग त्या वेदना पण जपून ठेवायच्या :)

बाकी.. आपण ज्याला आपले आपले म्हणून घट्ट कवटाळून ठेवतो ना, त्याला एक दिवस मोकळे करावे आणि भरारू द्यावे मोकळ्या आकाशात... ते परत फिरून आपल्यापाशी आले तर ते आपले, नाहीतर ते आपले कधीच नव्हते...

लिहीत राहा आणि share करत रहा :)